Loading...

आमच्या विषयी

परिचय

Image

माऊली ट्रस्ट

आषाढी-कार्तिकी माऊली ट्रस्ट ची स्थापना २००८ साली वारकरी संप्रदयाला एकत्र आणण्यासाठी करण्यात आली. परंतु ट्रस्टच्या कामाची व्याप्ती आणि केलेल्या कामाचा परिणाम बघता रोजगार मिळवण्यासाठी अनेक लोकं येऊ लागली. हळूहळू माऊली ट्रस्ट फक्त वारकऱ्यांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास साधण्यास कार्यरत संस्था म्हणून नावारूपाला येऊ लागली. रोजगाराच्या संधी निर्माण करणं ,पर्यावरणाचे महत्व सांगून त्यातून रोजगार निर्मिती, संविधानातील सामान्य जनतेचे अधिकार समजावणे आणि यासगळ्यासाठी शासनाचा पाठिंबा मिळवून नवीन उपक्रम माऊली ट्रस्ट राबवत आली आहे.
देश व राज्य पातळीवरील पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आषाढी कार्तिकी माउली ट्रस्ट ने माउली ग्रीन आर्मी हा उपक्रम चालू केला असून या उपक्रमा मध्ये वृक्षदानातून वृक्षारोपण व संगोपन केले जात आहे. हा उपक्रम देश व राज्य पातळीवर रचनात्मक पद्धतीने "आषाढी कार्तिकी माउली ट्रस्ट" व "श्री बाळकृष्ण महाराज धर्मादाय संस्था" हि सहयोगी संस्था सायुक्तय दिद्यामाने माउली ग्रीन आर्मी हा उपक्रम राबवत आहेत.बाळासाहेब सानप

शेतकरी कुटुंबात वाढलेले, माळकरी संस्कारात वाढलेले, १९९० च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील एकमेव यशस्वी सॉफ्टवेअर (बँकेत) नोकरी करणारे बाळासाहेब सानप सर काही बदलांमुळं भरकटले. वारीचं महत्व जाणून घेण्यासाठी वारीला जाऊन आले. त्यानंतर सानप सरांच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली. ज्ञानेश्वरमाऊलींची ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा वाचली. वारी आणि पालखी सोहळ्याचा लाभ जास्तीतजास्त लोकांना घेता यावा यासाठी आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्याचे चित्रीकरण (व्हिडीओ ) करून त्यासाठी वेबसाइट बनवायची ठरवली. परंतु अडथळा असा की ज्या लोकांसाठी हे सुविधा करायची त्यांना नवीन तंत्रज्ञान (technology ) याबद्दल माहिती नाही. लोकांपर्यंत पोहोचायचा मार्ग सरांना काही सल्लागारांकडून मिळाला तो म्हणजे ट्रस्ट ची स्थापना.

माहिती मिळवा

Image

Our Features