Loading...
Image

माऊली ट्रस्ट

आषाढी-कार्तिकी माऊली ट्रस्ट ची स्थापना २००८ साली वारकरी संप्रदयाला एकत्र आणण्यासाठी करण्यात आली. परंतु ट्रस्टच्या कामाची व्याप्ती आणि केलेल्या कामाचा परिणाम बघता रोजगार मिळवण्यासाठी अनेक लोकं येऊ लागली. हळूहळू माऊली ट्रस्ट फक्त वारकऱ्यांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास साधण्यास कार्यरत संस्था म्हणून नावारूपाला येऊ लागली. रोजगाराच्या संधी निर्माण करणं ,पर्यावरणाचे महत्व सांगून त्यातून रोजगार निर्मिती, संविधानातील सामान्य जनतेचे अधिकार समजावणे.
देश व राज्य पातळीवरील पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आषाढी कार्तिकी माउली ट्रस्ट ने माउली ग्रीन आर्मी हा उपक्रम चालू केला असून या उपक्रमा मध्ये वृक्षदानातून वृक्षारोपण व संगोपन केले जात आहे. हा उपक्रम देश व राज्य पातळीवर रचनात्मक पद्धतीने "आषाढी कार्तिकी माउली ट्रस्ट" व "श्री बाळकृष्ण महाराज धर्मादाय संस्था" हि सहयोगी संस्था सायुक्तय दिद्यामाने माउली ग्रीन आर्मी हा उपक्रम राबवत आहेत.

माहिती मिळवा